
World Old Watch : OMG! हे आहे जगातील सर्वात जुनं घडयाळ, ५ विमाने खरेदी करता येतील एवढी आहे किंमत
Pomander Watch 1505 : स्टाईल स्टेटमेंटमध्ये महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या घड्याळाची क्रेझ अनेकांना असते. मग अशांसाठी बाजारात विविध ब्रँड उपलब्ध असतातच. जगातील सर्वात चांगल्या ब्रँडचे घड्याळ आपल्या मनगटावर असावं अशी इच्छा घड्याळाची आवड असणाऱ्या प्रत्येकाची असते. पण मनगटावर घड्याळ बांधताना असा प्रश्न पडला का ओ तुम्हाला की, जगात पहिलं घड्याळ कधी अस्तित्वात आलं? किंवा मग जगातील सर्वात महागडे घड्याळ कोणतं असेल तर जगात असं एक घड्याळ आहे, ज्याची किंमत इतकी आहे की त्या रकमेत 4-5 विमाने खरेदी करता येतात.
हे घड्याळ 'पोमेंडर वॉच ऑफ 1505' किंवा 'वॉच 1505' म्हणून ओळखलं जातं. असं म्हणतात की हे जगातील पहिलं घड्याळ आहे, जे जर्मन सायंटिस्ट पीटर हेनलिन यांनी बनवलं होतं. हे घड्याळ 1505 मध्ये बनविण्यात आल्याचं सांगितलं जातं. जगातील सर्वात पहिलं घड्याळ सफरचंदासारखं दिसायला आहे. 1987 मध्ये, एका व्यक्तीने लंडनमधील फ्ली मार्केटमधून 10 पौंडांना हे घड्याळ विकत घेतले. पण त्याला या घड्याळाची किंमत काय आहे हे माहित नव्हते. नंतर त्याने ते घड्याळ दुसऱ्याला विकलं. मग ती विकत घेणार्याने दुसर्याला विकलं. हे विकण्याचं सत्र सुरूच राहिलं, पण कोणालाच त्याची खरी किंमत माहिती नव्हती.
कालांतराने हे घड्याळ जुन्या गोष्टींवर संशोधन करणाऱ्या व्यक्तीच्या हातात पडलं. त्याने पाहिलं की घड्याळावर त्याचा शोधक पीटर हेनलिनचे चिन्ह आहे आणि त्याच्या शोधाचे वर्ष देखील त्यावर लिहिलेले आहे. त्यानंतरच या घड्याळाची नेमकी किंमत कळू शकली.
कॉपर (तांबे) आणि सोन्यापासून बनवलेल्या या घड्याळाच्या किंमतीबद्दल 2014 मध्ये, अमेरिकेच्या अँटिक वीक मासिकाने अंदाज व्यक्त केला होता की आजच्या काळात याची किंमत 50 ते 80 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 413 कोटी ते 661 कोटी रुपये असू शकते. या किमतीत 4-5 खाजगी जेट आरामात खरेदी करता येतात.