सावरकर नसते तर खरा इतिहास समजला नसता - अमित शहा

बाजीराव पेशवा, शीख धर्मगुरू, दुर्गादास राठोड यासारख्या महापुरूषांना योग्य न्याय मिळेल असे इतिहास लेखन व्हायला हवे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Many things in history including war of 1857 true history would not have been understood Savarkar Amit Shah
Many things in history including war of 1857 true history would not have been understood Savarkar Amit Shahsakal

नवी दिल्ली - इतिहास बदलणे हा फक्त सरकारांचा विषय नव्हे असे सांगतानाच, स्वातंत्र्यवीर सावरकर नसते तर इतिहासातील १८५७ च्या युध्दासह इतिहासातील अनेक गोष्टी व सत्ये उजेडात आली नसती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितले. बाजीराव पेशवा, शीख धर्मगुरू, दुर्गादास राठोड यासारख्या महापुरूषांना योग्य न्याय मिळेल असे इतिहास लेखन व्हायला हवे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिल्लीत ‘महाराणा- हजार वर्षांचे धर्मयुध्द' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले की काही लोकांनी इतिहास विकृत केला हे सत्य आहे. त्यांना जे वाटे ते त्यांनी लिहीले.

मात्र पुढील पिढ्यांसाठी आम्हाला आमचा खरा इतिहास लिहीण्यापासून कोणी रोखू शकत नाही व तसे करण्यास थांबविण्यास आमच्यावर कोणाचे उपकार नाहीत. आमचा इतिहास आम्ही स्वतः लिहू शकतो. भारताच्या लोकानी १००० वर्षे आपला धर्म, आपली भाषा व संस्कृतीसाठी संघर्ष करत केला आहे. क्रूरकर्मा आक्रमकांना भारतात आल्यावर थोपविले गेले. आमचे प इतिहासाच्या नव्या पुस्तकांतून भारताचा खरा इतिहास जगासमोर आणण्याचा स्वर खोट्याचा प्रसार करणाऱयांपेक्षा तीव्र व मोठा पाहिजे. भारताचे आजचे पुनरूथ्थान पाहून आमचे पूर्वज जेथे कोठे असतील तेथे ते आनंदी होतील. नागभट्ट व प्रतिहार राजांच्या मदतीने बाप्पा रावल यांनी इस्लामिक आक्रमकांना हरविले व अरबांच्या डोळ्यासमोर दिवसाही तारे दिसू लागले. त्यांच्या शौर्यासमोर पुढची ५०० वर्षे भारताचे नाव घेण्याचीही या साऱयांची हंमत झाली नाही. मात्र आज विद्यार्थी बाप्पा रावल यांच्याबाबत किती जाणतात ? हे असे घडायला नको.

शहा यांनी सांगितले की इतिहासाकारांनी भूतकाळातील गौरवास्पद क्षण पुरर्जीवीत केले तरच उज्वल भविष्याच्या निर्माणास मदत मिळेल. ८०० ते ९०० वर्षांहून जास्त काळ आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी युध्दे केली तेव्हा आम्ही वाचलो आहोत. आमच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी लोकांनी बलिदान दिले आहे. मात्र ज्यांनी इतिहास विकृत केला त्यांची भाषा आम्ही कशाला स्वीकारली ?

सवार् मानसिंहांनी अकबराशी करार केला तर आम्ही त्यांच्या सवाई महालाला हवाई महाल म्हणू लागलो. यासारख्या गोष्टींतील असत्य जगासमोर आणून सत्य जगासमोर मांडणे ही इतिहासकारांची जबाबदारी आहे. इतिहासकारांनी फक्त मुघल साम्राज्याचे वर्णन केले. मात्र त्याआदी भारतात पांड्य साम्राज्य ८०० वर्षे, अहोम राज्य ६५०वर्षे, पल्लव व चालुक्य राजवंश प्रत्येकी ६०० वर्षे, मौर्य साम्राज्य ५०० वर्षे तर गुप्त साम्राज्य ४०० वर्षे याच देशात राहिले आहे. या साम्राज्यांचे वर्णन का दडपले गेले ? ते भारताच्या इतिहासात का प्रस्थापित केले गेले नाही असाही सवाल शहा यांनि विचारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com