esakal | दिल्लीतही पोवाड्याने रंगला मराठी भाषा दिन
sakal

बोलून बातमी शोधा

Parth-Akotkar

‘एकाच गावातील भाषा प्रमाण भाषा नाही’
‘जेनयू’मध्ये गेली अनेक वर्षे फ्रेंच शिकवणारे प्रा. बाविस्कर यांनी, विशिष्ट गावातला विशिष्ट समाज ज्या पद्धतीने भाषा बोलतो ती प्रमाण भाषा नाहीच, हे आम्ही समजून घेत नाही व मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्यांना रोजगाराची हमी देत नाही, तोवर मराठीच काय, पण भारतीय भाषांचे खुरटलेपण वाढतच जाईल, असे परखडपणे सांगितले. जेएनयूमध्ये महाराष्ट्राच्या इतर भागांतील विद्यार्थी पुण्यातल्या विद्यार्थ्यांबरोबर साधे बोलायचेही टाळतात, असे निरीक्षण नोंदवून ते म्हणाले की, आदान-प्रदान व सर्व बोलींबद्दल सन्मान हे भाषेच्या विकासासाठी अत्यावश्‍यक आहे.

दिल्लीतही पोवाड्याने रंगला मराठी भाषा दिन

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - पाच-सहा वर्षांचा चिमुरडा संत तुकारामांच्या वेषात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ हा अभंग लताबाईंनी गायलेल्या चालीतच म्हणत होता, महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षेचे काम चोवीस तास करणाऱ्या पोलिस दलाचे दोन जवान पोवाडे सादर करत होते, एरवी फक्त बातम्या पाठविण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्र परिचय केंद्राचे दोन उपसंपादक या कार्यक्रमासाठी झटून मेहनत घेत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपापल्या मातीपासून हजारो मैलांवर येऊन मराठी टिकविण्याची धडपड करणाऱ्या मराठीजनांची दाद या साऱ्यांना मिळत होती...निमित्त होते मराठी भाषा दिनानिमित्त राजधानीत साजऱ्या झालेल्या कार्यक्रमाचे.

'मराठीचे कुणीही वाकडे करू शकत नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र सदनात साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात पोवाडा, भक्तिगीते, व्याख्याने आदी कार्यक्रमांनी रंगत आली. महाराष्ट्र सदनाचे ग्रंथालय समृद्ध करण्यात येत असून, तेथे नवनवीन पुस्तकांबरोबरच ज्ञानपीठ विजेत्या सर्व मराठी साहित्यिकांची छायाचित्रेही लावण्यात येतील, असे निवासी आयुक्त समीर सहाय यांनी सांगितले. 

‘मराठी अनिवार्य’वर शिक्कामोर्तब

राजशिष्टाचार आयुक्त शामलाल गोयल, फ्रेंच शिकवणारे प्रा. शरद बावीस्कर, ब्लॉग लेखिका ऋचा माई आदी प्रमुख पाहुणे होते. एमआयसीचे रितेश भुयार व अंजू निमसरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’ 

पार्थ अकोटकर या सहा वर्षांच्या बालकाने तुकारामांच्या वेशभूषेत त्यांचा अभंग सादर करून दाद मिळवली. त्यानंतर राजेश लाखे यांनी सादर केलेल्या शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेतील मानाचे पान असलेल्या प्रतापगड युद्धाच्या पोवाड्यावेळी सदनाच्या सुरक्षा यंत्रणेतील प्रकाश नरवळे व योगेश शिंदे या तरुणांनी सुरेल साथ केली.

loading image