

Latest Marathi Live Update News
esakal
राज्याच्या शिक्षणव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासह विद्यापीठांच्या गुणांकन पातळीत सुधारणा करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाशी थेट जोडलेले कृती दल स्थापन करावे, असे निर्देश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिले. राजभवन येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि ‘व्हिजन महाराष्ट्र २०४७’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.