Marathi Live News update: भोंदूगिरीच्या आड काळ्या पैशांचा खेळ उघड, अशोक खरात प्रकरणात कोट्यवधींची जप्ती

Latest Marathi Breaking News and Live Updates from Maharashtra and India : महाराष्ट्रासह देश-विदेशातील ब्रेकिंग न्यूज, राजकीय घडामोडी, हवामान, अपघात, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेट्स वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये.
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Nashik Live भोंदूगिरीच्या आड काळ्या पैशांचा खेळ उघड, अशोक खरात प्रकरणात कोट्यवधींची जप्ती

दैवी शक्ती असल्याचा बनाव करून धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली खंडणीचे जाळे उभारणाऱ्या अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ताब्यात असलेल्या खरातच्या चौकशीतून त्याच्या साथीदारांकडून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा फिरवला जात असल्याचे उघड झाले असून एका व्यावसायिकाकडून एकाच दिवशी तब्बल १३ कोटी ५० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. काळा पैसा पांढरा करण्यासाठी दोन पतसंस्थांचा वापर केल्याचेही तपासात स्पष्ट झाले असून या संस्थांमधून सुमारे २०० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत रोख रक्कम, विदेशी चलन, सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com