शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत मराठी खासदारांकडून अभिवादन

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह प्रमुख नेत्यांनी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे. महाराष्ट्रात आज शाहू जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. कोल्हापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दसरा चौकातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

नवी दिल्ली : राजर्षी शाहू महाराजांच्या 145 व्या जयंतीनिमित्त आज (बुधवार) दिल्लीतील महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येत संसदेच्या आवारातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

शाहू महाराज यांची जयंती निमित्त संसदेच्या आवारातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार छत्रपती संभाजीराजे, रामदास आठवले, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, गिरीश बापट, सुप्रिया सुळे, भारती पवार, हुसेन दलवाई, नरेंद्र जाधव, विनायक राऊत, सुनील तटकरे, कुमार केतकर, विनय सहस्त्राबुद्धे, श्रीरंग बारणे आदी खासदार उपस्थित होते.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह प्रमुख नेत्यांनी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे. महाराष्ट्रात आज शाहू जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. कोल्हापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दसरा चौकातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi MPs pay tributes to Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on his birth anniversary