79 टक्के महिला, 78 टक्के पुरुष करताहेत मुलीच्या जन्माचे स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नवी दिल्ली - मुलीचा जन्म नाकारणे याला देशात बराच विरोध झाला. बेटी बचाओ, बेटी पढाओ संदर्भात नवनवीन योजना राबविण्यात आल्यात. या सर्व प्रयत्नांना देशातील मुलींच्या घटत्या जन्मदराची परिस्थिती बदलण्यात यश आले आहे. नुकताच राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षणने (एनएफएचएस) याबाबत केलेल्या अभ्यासाचा अहवाल प्रसिध्द केला आहे. या अहवालानुसार, देशातील 15 ते 49 वयोगटातील 79 टक्के महिला आणि 15 ते 54 वयोगटातील 78 टक्के पुरुषांनी आपल्याला किमान एक मुलगी असावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

याआधीही हे सर्वेक्षण 2005-06 साली झाले होते. तेव्हा झालेल्या सर्वेक्षणानुसार, 74 टक्के महिला व 65 टक्के पुरुषांनी आपल्याला मुलगी असावी, असे म्हटले होते. गेल्या दहा-बारा वर्षाचे चित्र पाहिले तर स्त्रीभृण हत्येचे प्रमाण बरेच होते. सर्वेक्षणात म्हटल्याप्रमाणे न अंमलात आणता प्रत्यक्षात मात्र लोकांनी मुलीची जबाबदारी नाकारली होती. पण आता लोकांना हीच केवळजबाबदारी न वाटता मुलीचा आपल्या घरात जन्म अभिमानाचे वाटते, हे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

या सर्वेक्षणातून प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार, धर्मनिहाय तुलना केली असता मुस्लिम समाजातील 81 टक्के, बौध्द समाजातील 79 टक्के, हिंदू समाजातील 79 टक्के लोकांना मुलगी हे अपत्य जन्माला यावे असे वाटते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या वर्गातील 86 टक्के महिला आणि 85 टक्के पुरुषांनी आपल्याला मुलगी असावी, असे म्हटले आहे. तर आपल्याला मुलींपेक्षा जास्त मुले असावीत, असे वाटणाऱ्या स्त्री-पुरुषांचे 19 टक्के प्रमाण आहे. देशातील केवळ 3.5 टक्के लोकांनाच आपल्याला मुलापेक्षा मुली अधिक असाव्यात असे वाटते. शहरी स्त्रियांच्या (75 टक्के) तुलनेत मुलगी जन्माला यावी ही इच्छा ग्रामीण भागातील महिलांमध्ये (81 टक्के) अधिक आहे. 85 टक्के अशिक्षित स्त्रिया अपत्य म्हणून मुलींनाच प्राधान्य देतात. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलांपैकी 72 टक्के महिलांना आपल्याला मुलगी जन्माला यावी, असे वाटते. तसेच बिहार (37 टक्के) आणि उत्तर प्रदेश (31 टक्के) येथे मुलीपेक्षा मुलगा अपत्य म्हणून पाहीजे असणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे.   

Web Title: marathi news 79 women 78 men want a girl child in india