मी बोलण्यापेक्षा माझे कामच बोलेल: पोलिस आयुक्त

संजय सूर्यवंशी
गुरुवार, 4 जानेवारी 2018

गुलबर्गा, विजापूरसह या रेंजमध्ये काम केलेले आहे. परंतु, प्रत्यक्ष बेळगाव जिल्ह्यात काम करण्याची संधी कधी आली नाही. येथे आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बेळगावबाबतची प्राथमिक माहिती घेतलेली आहे. प्रत्येक ठाण्याला भेट देऊन, कॉन्स्टेबलपासून सर्वांशी संपर्क साधून तळागाळातील माहिती घेतल्यानंतरच आपण बेळगावबाबत बोलू, त्यामुळे आता तपशीलवार काही बोलता येणार नाही, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले.

बेळगाव : कवी मनाचा असलो तरी कविता करणे हा माझा एक छंद आहे. त्यामुळे जेव्हा काम करतो तेथे कुठलीही तडजोड करत नाही. बेळगावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करत पोलीस प्रशासन सशक्त करण्यात कोणतीही हयगय केली जाणार नाही, असे नूतन पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांनी सांगितले. आज सकाळी दहा वाजता त्यांनी पोलीस आयुक्तपदाची सुत्रे स्विकारली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

गुलबर्गा, विजापूरसह या रेंजमध्ये काम केलेले आहे. परंतु, प्रत्यक्ष बेळगाव जिल्ह्यात काम करण्याची संधी कधी आली नाही. येथे आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बेळगावबाबतची प्राथमिक माहिती घेतलेली आहे. प्रत्येक ठाण्याला भेट देऊन, कॉन्स्टेबलपासून सर्वांशी संपर्क साधून तळागाळातील माहिती घेतल्यानंतरच आपण बेळगावबाबत बोलू, त्यामुळे आता तपशीलवार काही बोलता येणार नाही, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले. परंतु, पोलीस कॉन्स्टेबलपासून मी आयुक्तापर्यंत सर्वजण एक टीम आहे, असे मी मानतो. त्यामुळे सर्वांना विश्‍वासात घेऊन येथील नेमकी आव्हाने कोणती आहेत, त्याचा सखोल अभ्यास करून मगच त्यावर मी भाष्य करेन. मी बोलण्यापेक्षा आधी माझे काम बोलले पाहिजे. यासाठी सर्व माध्यम प्रतिनिधींना पुढील महिन्यात बोलावून आपल्या कामाची रूपरेषा स्पष्ट करेन, असे ते म्हणाले. 
*कविता वेगळ्या पोलिसींग वेगळे 

कवी मनाचे अधिकारी मग कायदा व सुव्यवस्थेचे काय? असा प्रश्‍न अनेकांच्या मनात येऊ शकतो. परंतु, कविता करणे हा माझा कॉलेज जीवनापासूनचा छंद आहे, तो व्यवसाय नव्हे. माझे मूळ काम कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे आहे. त्यामुळे फावल्या वेळेत कविता आणि पूर्णवेळ पोलिसींगला महत्व देणारा मी अधिकारी आहे. माझ्या मूळ कामात कसलीही हयगय होणार नाही याची हमी देतो, असेही राजप्पा यांनी स्पष्ट केले. आयुक्तपदाची सुत्रे घेण्याची नियमित प्रक्रीया पार पडली. यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाच्या डीसीपी सीमा लाटकर यांनी त्यांच्याकडे सुत्रे सुपूर्द केली. यावेळी वाहतूक व गुन्हे विभागाचे डीसीपी अमरनाथ रेड्डी उपस्थित होते. यानंतर नूतन आयुक्तांनी तातडीने शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेतली.

Web Title: Marathi news Belgaum news police commissioner