ब्राउन शुगर विकणाऱ्या टोळीला अटक; मुंबईची महिला मुख्य पुरवठादार 

संजय सूर्यवंशी
गुरुवार, 11 जानेवारी 2018

बेळगाव - ब्राउन शुगर विकणाऱ्या १४ जणांच्या टोळीला बेळगावच्या सीसीआयबीच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख 50 हजार रुपयांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईच्या एका महिलेचाही समावेश असून ती बेळगावच्या टोळीला ब्राऊन शुगरचा पुरवठा करीत होती, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

9 जानेवारी रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास केएलई बायपास रोड ते शांतेशा मोटर्स दरम्यान दोघा संशयित तरुणांना सीसीआयबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मादक द्रव्य सापडल्याने अधिक चौकशी केली असता ते ब्राऊन शुगर असल्याचे स्पष्ट झाले. तपासाला सुरवात केल्यानंतर याशीन हसन शहापुरी (26 रा. आझाद नगर पहिला क्राँस) व सूरज शिवाजी शिंदे (वय 39, रा. आनंद अपार्टमेंट सदाशिवनगर) हे दोघेजण बेळगावात ब्राऊन शुगरची विक्री करत असल्याचे समजले. याच्या विक्रीसाठी या दोघांनी 11 तरुणांची टोळी तयार केली होती. त्यांच्यामार्फत बेळगाव परिसरातील नशेबाज लोकांना ब्राउन शुगरचा पुरवठा केला जात होता. या दोघांची जेव्हा चौकशी केली तेव्हा हे मुंबईतील सुशीला पोन्नस्वामी देवेंद्र (रा. सल्लामडी हिल, जीटीबी नगर, सायन मुंबई) हिच्याकडून ब्राऊन शुगर खरेदी करून ते बेळगावात विकत असल्याचे स्पष्ट झाले. सीसीआयबीच्या पथकाने तेथून सदर महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून एक लाख पाच हजार रुपयांचे सुमारे 350 ग्रॅम ब्राउन शुगर व साडेचार हजार रुपयांची रोकड जप्त केली. सीसीआयबीचे डीसीपी आर आर कल्याण शेट्टी, पोलिस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, उपनिरीक्षक यु. बी. कट्टीकर,  व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Web Title: marathi news brown sugar Arrested Womens Chief Supplier of Mumbai