श्री मोदी न म्हटल्याने जवानाचा कापला पगार

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

नवी दिल्ली - मोदींच्या नावापुढे श्री किंवा माननीय असा आदरार्थी शब्दांचा वापर न केल्याने सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) एका जवानाला हे चांगलेच महागात पडले आहे. असे केल्याबद्द्ल या जवानाचा सात दिवसांचा पगार कापण्यात आला आहे. संजीव कुमार असे या जवानाचे नाव आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पश्चिम बंगालमधील महतपूर येथे बीएसएफच्या 15व्या बटालियनचे जवान 'झिरो परेड' करत होते. जवानांच्या दररोजच्या सरावातील तो एक भाग आहे. या परेडमध्ये कॉन्स्टेबल संजीव कुमारने रिपोर्ट करताना 'मोदी प्रॉग्रेम' असा उल्लेख केला. याची दखल घेत कमांडंट अनूपलाल भगत यांनी संजीव कुमारवर कारवाई केली आहे. बीएसएफ अॅक्टमधील नियम 40 अंतर्गत त्यांनी ही कारवाई केली. संजीवकुमारचा सात दिवसांचा पगार कापण्यात आला आहे.

बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्तावर कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title: marathi news BSF jawan prime minister narendra modi