आता कर्नाटकमध्ये दलित पुजारी : सिद्धरामय्या

वृत्तसंस्था
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

त्रावणकोर देवस्थान बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. या बोर्डाच्या अंतर्गत केरळमधील सुमारे एक हजार 248 मंदिरांचा समावेश होतो.

बंगळूर : केरळप्रमाणे कर्नाटकमधील मंदिरांमध्ये दलित पुजाऱ्यांची नियुक्ती करण्याचा विचार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

म्हैसूरमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, "केरळप्रमाणे कर्नाटकमध्येही राज्याच्या धार्मिक आणि धर्मादाय देणग्यांशी संबंधित विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मंदिरांमध्ये दलित पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यास आमचा विरोध नाही. अशा प्रकारच्या नियुक्‍त्यांसंबंधीचा निर्णय लवकरच घेतला जाईल.''

केरळमधील विविध मंदिरांमध्ये पुजारी म्हणून नियुक्ती करण्यासाठी 36 बिगर ब्राह्मण व्यक्तींची नुकतीच शिफारस करण्यात आली असून, त्यात सहा दलित व्यक्तींचा समावेश आहे. त्रावणकोर देवस्थान बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. या बोर्डाच्या अंतर्गत केरळमधील सुमारे एक हजार 248 मंदिरांचा समावेश होतो. केरळमधील "माकप'च्या सरकारने या निर्णयाचे वर्णन "मूक क्रांती' असे केले आहे.

Web Title: marathi news dalit pujari in karnataka