अतिविशिष्ट व्यक्तींच्या ताफ्याने दिल्लीला वाहतूक कोंडी

पीटीआय
सोमवार, 12 मार्च 2018

नवी दिल्ली : अतिविशिष्ट व्यक्तींच्या वाहनांच्या ताफ्यामुळे आज शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. राजधानीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सोलर अलाइन्स परिषदेला हजर राहण्यासाठी अनेक राष्ट्रप्रमुख येथे आले आहेत. त्यामुळे विमानतळावरून आपल्या नियोजित हॉटेलवर जाण्यासाठी त्यांच्या गाड्यांचा ताफा अनेक मार्गांवरून जात असल्याने वाहतूक कोंडी झाली होती, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या राष्ट्रप्रमुखांच्या ताफ्याला जाण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले होते. धौला कुआँ भागात वाहतूक संथ गतीने चालली होती. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.

त्याशिवाय फिरोझ शहा रोड, जनपथ, अकबर रोड, तीन मूर्ती, शांती पथ, सरदार पटेल मार्ग आणि द्वारका रोड येथेही वाहतूक कोंडी झाली होती, असे या अधिकाऱ्याने सांगितले. या ठिकाणी सकाळपासून वाहतूक कोंडीला सुरवात झाली असून, रात्रीपर्यंत हीच परिस्थिती राहण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: marathi news Delhi News Delhi Traffic Jam