तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा देण्यास पंतप्रधानांची विरोधकांना विनंती

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जानेवारी 2018

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अजेंडा ठरवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत तिहेरी तलाक संबंधित विधेयक मंजूर करण्यास पाठींबा द्यावा अशी विनंती विरोधकांना यावेळी केली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या भाषणाने सुरूवात झाली. 

राष्ट्रासाठी राजकरण बाजूला ठेऊन ग्रामीण भारत, शेतकरी, दलित, आदिवासी समाज, मजूर यांच्या विकासासाठी विचार करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सर्व पक्षांना केले. या अधिवेशनात मुस्लिम महिलांचे (विवाहाचे हक्क संरक्षण) विधेयक, 2017, तिहेरी तलाक, मजुरी विधेयक 2017, मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठीचे बाल हक्क, 2017 ही महत्त्वाची विधेयके चर्चा आणि मंजूरीसाठी सादर केले जातील.

लोकसभेत 28 विधेयके सादर केली जातील, तर आगामी अधिवेशनासाठी राज्यसभेसाठी 39 विधेयके सादर केली जातील. संसदेच्या या आधीच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत मंजूर झालेले हे तिहेरी तलाक विधेयक आता संसदेच्या उच्च सभागृहात मांडले जाईल. त्याचबरोबर ट्रांसजेंडर व्यक्ती (अधिकारांचे संरक्षण) 2016 व सरोगसी विधेयक याचीही चर्चा अधिवेशनात होणार आहे.

Web Title: Marathi news delhi news triple talaq bill passing bill request to opposition