नेपाळमध्ये 'स्वराज शिष्टाई' 

पीटीआय
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

काठमांडू : नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज विविध नेपाळी नेत्यांची भेट घेत त्यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. नेपाळसोबतचे बहुद्देशीय, ऐतिहासिक संबंध बळकट करण्याबरोबरच 'त्या' देशातील राजकीय स्थैर्य आणि विकासाला भारताचा पाठिंबा असेल असे आश्‍वासनही त्यांनी नेपाळी नेत्यांना दिले आहे.

स्वराज यांचा नेपाळचा दोन दिवसीय सदिच्छा दौरा आजपासून सुरू झाला. आज त्यांनी अध्यक्ष विद्यादेवी भंडारी, पंतप्रधान शेर बहाद्दूर देऊबा आणि 'सीपीएन माओवादी' केंद्राचे अध्यक्ष प्रचंड यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 

सार्वत्रिक निवडणुकीनंतर देशामध्ये निर्माण झालेली स्थिती आणि नव्या सरकारची स्थापना याबाबत स्वराज यांच्याशी विस्ताराने चर्चा झाल्याचे प्रचंड यांनी म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड यांच्या 'सीपीएन- यूएमएल' या डाव्या आघाडीला मोठे यश मिळाले होते. नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल स्वराज यांनी पंतप्रधान देऊबा यांचे स्वागत केले. 

ओलींची भेट 
नेपाळचे भावी पंतप्रधान आणि 'सीपीएन- यूएमएल' आघाडीचे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली यांचीही स्वराज यांनी गुरुवारी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. डाव्या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या ओली यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर टीका केली होती. नेपाळच्या अंतर्गत कारभारामध्ये भारत हस्तक्षेप करत असून, हे सरकार पाडण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

आर्थिक मदत 
नेपाळच्या प्रगतीचे चक्र अधिक गतिमान व्हावे म्हणून भारत पुढील आर्थिक वर्षात मदतनिधीचे प्रमाण 74 टक्‍क्‍यांनी वाढविण्याच्या विचारात आहे, असे 'काठमांडू पोस्ट'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. भारताचे अर्थमंत्रालय 2018-19 साठी नेपाळला दहा अब्ज रुपयांचा निधी देणार आहे. विशेष म्हणजे ताज्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: marathi news EAM Sushma Swaraj Nepal India Relations