गोवा - वाळपईत शिवाजी महाराजांचा पुतळा पालिकेने रातोरात हलवला

पद्माकर केळकर
गुरुवार, 1 मार्च 2018

वाळपई (गोवा) : वाळपई सत्तरी येथील हातवाडा येथे शिवप्रेमींनी गेल्या वर्षी 19 फेब्रुवारीच्या पहाटे शिवपुतळा बसविला होता. काही महिन्याअगोदर यापरिसरात सरकारने 15 मीटर क्षेञावर 144 कलम लागु केले. होते. आज 1 मार्चला पहाटे 5.30 च्या सुमारास वाळपई नगरपालिकेने पोलीस संरक्षणात हा पुतळा हटविला आहे. ही खबर वाळपई परिसरात पसरतात सकाळपासून तमाम शिवप्रेमींनी वाळपईत जमा होण्यास सुरुवात केली.

या घटनेचा तीव्र शब्दात शिवप्रेमींनी वाळपई पालिकेचा निषेध व्यक्त केला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता हा शिवपुतळा हटविल्याने वाळपईत तणावाचे वातावरण आहे. पहाटे पासुनच मोठा पोलीस फौज फाटा  तैनात करण्यात आलेला आहे. शिवप्रेमींनी याबाबत वाळपई पोलीस स्थानकात जाऊन याविषयी जाब विचारला. तसेच वाळपई पालिकेत जाऊन जाब विचारला आहे.

Web Title: Marathi news goa news shivaji maharaj statue shift by municipal corporation

टॅग्स