पाकच्या गोळीबारामुळे विधानसभेत गोंधळ 

पीटीआय
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

जम्मू : जम्मू आणि काश्‍मीरमधील राजौरी आणि पूँच येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात चार भारतीय जवान हुतात्मा झाल्याच्या घटनेमुळे जम्मू आणि काश्‍मीर विधानसभेत आज गोंधळ झाला.

या गोंधळानंतर सभापती कविनंदर गुप्ता यांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. काल पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ पूँच आणि राजौरी येथे केलेल्या गोळीबारात कॅप्टनसह अन्य तीन जवान हुतात्मा झाले, तर चार नागरिक जखमी झाले. 

विधानसभेचे कामकाज आज सकाळी सुरू झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार मियान अल्ताफ यांनी याप्रकरणी मुद्दा उपस्थित केला आणि सरकारने स्पष्टीकरण करण्याची मागणी त्यांनी केली. प्रश्‍नोत्तराचा तास संपताच भाजपचे आमदार रवींदर रैना यांनी पाकिस्तानच्या गोळीबाराचा राज्य सरकारने पत्रक काढून निषेध करण्याची मागणी केली. त्यानंतर सदस्यांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरवात केली.

त्याच वेळी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार देवेंद्र राणा, अपक्ष आमदार पवन गुप्ता आणि कॉंग्रेसचे आमदार चौधरी अक्रम हेसुद्धा हौद्यात उतरून घोषणाबाजी करू लागले. या घटनेला कोण जबाबदार, कुठे आहे 56 इंच छाती, अशा प्रकारच्या घोषणा देण्यास त्यांनी सुरवात केली.

Web Title: marathi news Indian Army Pakistan Ceasefire violation Jammu Kashmir Assembly