हवामान बदल हा मोठा विषय : पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जानेवारी 2018

संपूर्ण जग एक कुटुंब आहे, हा भारतीय विचार आहे. आपण सर्व एका कुटुंबासारखे जोडलेलो आहोत. जगाला सुंदर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. दहशतवादाबाबत ते म्हणाले, "दहशतवाद जेवढा धोकादायक आहे, त्याहीपेक्षा चांगला दहशतावाद आणि वाईट दहशतवाद अशी विभागणी घातक आहे''.

दावोस : गेल्या 21 वर्षांत अर्थव्यवस्थेत झाली आहे. सध्या हवामान बदल हा मोठा विषय आहे. आर्टिक महासागरातील हिमपर्वत हळूहळू वितळत आहेत. ही एक चिंतेची बाब आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथील 48 व्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम'मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, सोशल मीडिया जोडणारे आणि तोडणारेही आहे. भारताचा सहापट विकास झाला आहे. सध्या जगासमोर शांतता आणि सुरक्षेचे आव्हान आहे. तंत्रज्ञानामुळे अर्थकारण तेजीत आहे. तसेच सर्वात महत्वाचे हवामान बदल, राष्ट्रीय स्तरावरील चांगला आणि वाईट दहशतवाद अशी विभागणी झाली आहे. 

संपूर्ण जग एक कुटुंब आहे, हा भारतीय विचार आहे. आपण सर्व एका कुटुंबासारखे जोडलेलो आहोत. जगाला सुंदर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. दहशतवादाबाबत ते म्हणाले, "दहशतवाद जेवढा धोकादायक आहे, त्याहीपेक्षा चांगला दहशतावाद आणि वाईट दहशतवाद अशी विभागणी घातक आहे''.

शाश्वत विकास हाच खरा विकास आहे. निर्सगाला ओरबडून घेणे म्हणजे विकास नाही. पर्यावरणाचे शोषण न करता वापर केला पाहिजे.

दरम्यान, यापूर्वी 1997 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा दावोस येथे गेले होते. त्यावेळी जीडीपी सुमारे 4 मिलियन डॉलरच्या जवळपास होता. आता यामध्ये वाढ होऊन तो सहापट वाढला आहे. जगभरात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा प्रस्थापित होण्यासाठी सामोरे जात आहे. हे मोठे विषय आहेत. हवामान बदल हा देखील त्यातीलच एक आहे. 
 

Web Title: Marathi news International news Davos 2018 LIVE Peace security and stability have emerged as global challenges says Narendra Modi