आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्क्वॅशपटू यश फडतेचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुरगाव - 'दैनिक गोमंतक'ने माझी जगाला ओळख करुन दिली, असे भावपूर्ण उद्गार आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्क्वॅशपटू यश फडते यांनी काढले. गोव्याचा यश फडते याने डिसेंबरमध्ये अमेरिकेत झालेल्या यू एस ओपन ज्युनिअर स्क्वॅश स्पर्धा जिंकून हा पराक्रम करणारा पहिला भारतीय स्क्वॅशपटू बनल्याबद्दल त्याचा सत्कार वास्को येथील चौगुले शिक्षण संस्थेच्या सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटच्या पालक शिक्षक संघटना आणि व्यवस्थापनाने रवींद्र भवन येथे आयोजित केला होता. तेव्हा त्यांनी सत्काराला उत्तर देताना दै. गोमंतक ने माझी जगासमोर ओळख केल्याचे सांगितले.

मुरगाव - 'दैनिक गोमंतक'ने माझी जगाला ओळख करुन दिली, असे भावपूर्ण उद्गार आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्क्वॅशपटू यश फडते यांनी काढले. गोव्याचा यश फडते याने डिसेंबरमध्ये अमेरिकेत झालेल्या यू एस ओपन ज्युनिअर स्क्वॅश स्पर्धा जिंकून हा पराक्रम करणारा पहिला भारतीय स्क्वॅशपटू बनल्याबद्दल त्याचा सत्कार वास्को येथील चौगुले शिक्षण संस्थेच्या सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटच्या पालक शिक्षक संघटना आणि व्यवस्थापनाने रवींद्र भवन येथे आयोजित केला होता. तेव्हा त्यांनी सत्काराला उत्तर देताना दै. गोमंतक ने माझी जगासमोर ओळख केल्याचे सांगितले. यश फडते याचा अर्जुन पुरस्कार विजेत्या देशाचे माजी आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू ब्रम्हानंद शंखवळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार कार्लोस आल्मेदा व एलिना सालधाना, नगराध्यक्ष दीपक नाईक, नगरसेवक दाजी साळकर, उद्योजक अशोकराव चौगुले व इतर व्यासपीठावर उपस्थित होते. यश फडते हा सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटचा माजी विद्यार्थी आहे.

Web Title: marathi news junior squash competition yash phadate