कार्ती चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 मार्च 2018

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी गैरव्यवहाराचा आरोप असलेले कार्ती चिदंबरम यांना वीस मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. कार्ती हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र असून, त्यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोप ठेवला आहे. 

कार्ती यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) भ्रष्टाचाराचा आरोप करत खटला दाखल केला आहे. या प्रकरणी विशेष न्यायालयाने कार्ती यांना जामीन मंजूर केला असल्याने उच्च न्यायालयात या प्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत 'ईडी' त्यांना अटक करू शकत नाही, असे न्या. एस. रवींद्र भट यांनी आज स्पष्ट केले.

सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणी दुसऱ्या न्यायालयाने कार्ती यांना जामीन मंजूर केला असेल, तर कार्ती यांच्यावर 'ईडी'समोर हजर राहण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे निर्बंध घालता येतील, असे न्यायालयाने सांगितले.

तसेच, कार्ती यांना देशाबाहेर जाण्यास मनाईदेखील करता येईल. या प्रकरणी कार्ती यांना अटक करण्याचे 'ईडी'ला घटनात्मक अधिकार आहेत का, हेदेखील अद्याप सिद्ध झाले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title: marathi news Karti Chidambaram INX Media scam