काश्मीरमध्ये चकमक : कमांडो शहीद, पाच अतिरेक्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

श्रीनगर : काश्मीरमधील बंदीपुरा जिल्ह्यात आज (शनिवार) अतिरेक्यांशी सुरू असलेल्या चकमकीत भारतीय हवाई दलाच्या गरूड कमांडो फोर्सचे एक कमांडो शहीद झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. 

चंदेरगीर खेड्यातील हजीन भागात ही चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत पाच अतिरेकी मारले गेले आहेत. या भागात अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे सुरक्षा दलांनी नाकाबंदी करून शोध मोहिम सुरू केली होती. शोध मोहिम सुरू असतानाच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये पाच अतिरेकी मारले गेले. 

अतिरेक्यांच्या गोळीबारात हवाई दलाच्या गरूड कमांडो फोर्सचे एक कमांडो शहीद झाले आहेत. गरूड कमांडो फोर्स हा हवाई दलाची सर्वोत्तम आणि आक्रमक विभाग आहे. 2004 मध्ये या विभागाची अतिरेकी-विरोधी मोहिमांसाठी स्थापना झाली आहे. 

दरम्यान, बंदीपुरा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा आणि मोबाईल इंटरनेट काही काळापुरती बंद करण्यात आली आहे. अतिरेक्यांचा पूर्ण बिमोड केल्यानंतर ही सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

Web Title: Marathi news Kashmir encounter Bandipora Commando martyred