कुलभूषण यांच्या कुटुंबीयांना हीन वागणूक मिळणे हे केंद्र सरकारचे अपयश : काँग्रेस

पीटीआय
बुधवार, 27 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानकडून अतिशय हीन दर्जाची वागणूक देण्यात आली असून, हे केंद्र सरकारचे राजनैतिक अपयश असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी आज केली. 

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानकडून अतिशय हीन दर्जाची वागणूक देण्यात आली असून, हे केंद्र सरकारचे राजनैतिक अपयश असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी आज केली. 

''जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानकडून देण्यात आलेली वागणूक अमानवी होती. जाधव यांच्या आई व पत्नीला पाकिस्तानकडून कुठल्या प्रकारचा राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) दिला जाईल याची परराष्ट्र मंत्रालयाने आगोदरच खात्री करायला हवी होती. त्यामुळे हे केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अपयश आहे,'' अशा शब्दांत मोईली यांनी तोफ डागली. जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात कुठल्या प्रकारची वागणूक दिली जाईल याबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पाकिस्तानी समकक्ष व्यक्तींबरोबर चर्चा करायला हवी होती, असेही मोईली म्हणाले. 

हेरगिरीच्या आरोपांखाली पाकिस्तानने जाधव यांना अटक केली असून, तेथील लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. 

आपण देश म्हणून जाधव यांना मदत करत आहोत की, त्यांना त्रास देत आहोत? जाधव कुटुंबीयांना पाकिस्तानकडून अतिशय असभ्य वागणूक देण्यात आली. याचा भारताने जाब विचारायला हवा आणि जाधव यांना सुरक्षित मायदेशी आणण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. 
- मनीष तिवारी, काँग्रेसचे प्रवक्ते 

Web Title: marathi news Kulbhushan Jadhav Pakistan India Congress