बाळाच्या सदृढ आरोग्यासाठी जेवणाऐवजी ड्रायफ्रूट द्या ; पंचायत समितीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

बेळगाव: मातृपूर्ण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गर्भवती आणि बाळंतीणींना देण्यात येणारे जेवणाचा लाभार्थी फायदा घेत नाही. याकडे महिलांनी पाठ फिरवली आहे. तेव्हा महिलांच्या आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने जेवणाऐवजी ड्रायफ्रूट द्यावे, अशी मागणी तालुका पंचायत समितीच्या बैठकीत महिला सदस्यांनी मागणी केली.‌

राज्य शासनाने गर्भवती आणि बाळंतीण महिलांच्या आरोग्यासाठी आणि बाळाचं होणारे कुपोषण दूर करण्यासाठी रेशनऐवजी जेवण देण्यास सुरवात केली आहे. पण, या योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली आहे. तेव्हा या योजनेखाली देण्यात येणारे जेवण बंद करा, अशी मागणी महिला सदस्यांनी बुधवारी (ता.27) तालुका पंचायलीच्या बैठकीत लावून धरली. यावेळी अधिकाऱ्यांनी याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे अश्वासन दिले.

Web Title: marathi news local do not allot food allot dry fruits demanded by panchayat samiti