संशयास्पद संभाषणामुळे विमानाचा मार्ग बदलला

पीटीआय
सोमवार, 12 जून 2017

लंडन - विमानातील तीन प्रवाशांचे संभाषण संशयास्पद आढळल्याने स्लोव्हानियाहून ब्रिटनला जाणारे प्रवासी विमान जर्मनीला वळविण्यात आले. या तीन प्रवाशांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली.

ईझीजेट कंपनीचे हे विमान स्लोव्हानियातील लुबालनाहून ब्रिटनमधील स्टॅनस्टेडला काल (शनिवारी) जात होते. विमानातील तीन प्रवाशांचे संभाषण दहशतवादी कारवायांशी निगडित आढळल्याने काही प्रवाशांनी याची माहिती वैमानिकाला दिली. त्यामुळे वैमानिकाने हे विमान जर्मनील कोलोन-बॉन विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला.
तिघा संशयास्पद प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यातील एकाची बॅग सुरक्षा यंत्रणांनी नष्ट केली. या तिघांची चौकशी तपास यंत्रणा करत आहेत. विमानातील सर्व 151 प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवाशांना काल रात्री निवासाची सोय हॉटेलमध्ये करण्यात आली आणि आज सकाळी त्यांना पुढील प्रवासाला रवाना करण्यात आले.

Web Title: marathi news maharashtra news plane route