'त्या रुग्णालयात प्राणवायू सिलिंडर नव्हते, हे आम्हाला माहीतच नव्हते..!' 

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

लखनौ :  गोरखपूरमधील सरकारी रुग्णालयात प्राणवायूचे सिलिंडर नसल्याने झालेल्या मृत्युंसाठी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने आज (शनिवार) दिले. 

'बीआरडी रुग्णालयामध्ये प्राणवायूचे सिलिंडर नसल्याने किमान 30 जणांचा मृत्यु झाला' अशी माहिती गोरखपूर जिल्हा प्रशासनाने काल (शुक्रवार) रात्री दिली होती. पण राज्याचे आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्टपासून विविध कारणांनी किमान 60 जणांचा मृत्यु झाला आहे. 

या घटनेमुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, "बीआरडी रुग्णालयामध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.'' या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. 

दरम्यान, सिद्धार्थनाथ सिंह आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आशुतोष टंडन हे गोरखपूरमध्ये दाखल झाले आहेत. गोरखपूरला रवाना होण्यापूर्वी सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले होते, की 'रुग्णालयातील डॉक्‍टर आणि इतर अधिकाऱ्यांनी प्राणवायूच्या सिलिंडरच्या समस्येविषयी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काहीच माहिती दिली नव्हती. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनाही या समस्येसंदर्भात माहिती नव्हती. कारवाई करताना हे मुद्देही गृहीत धरले जाणार आहेत. योग्य ठिकाणी योग्य ती माहिती न देणाऱ्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल.' 

Web Title: marathi news marathi website Gorakhpur Tragedy BRD Hospital Yogi Adityanath Uttar Pradesh