काश्‍मिरात दोन दहशतवाद्यांचा खातमा

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

श्रीनगर : शोपियाँ जिल्ह्यात काल रात्री झालेल्या चकमकीत जैशे मोहंमद या दहशतवादी संघटनेतील दोन दहशतवाद्यांचा खातमा करण्यात सुरक्षा यंत्रणेच्या जवानांना यश आले आहे. या कारवाईत जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

वाणीपोरा भागात दहशतवादी आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार एक शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू करताच त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले; तर अन्य एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. या कारवाईत लष्करातील एक जवान आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. मारले गेलेले दहशतवादी 11 डिसेंबरला एका बॅंकेच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते. अशी माहिती समोर आली असून, गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचाही शोधही घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

चकमकीदरम्यान काही नागरिकांनी सुरक्षा यंत्रणेतील जवानांवर दगडफेक केली. त्यांना हुसकावून लावण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला. अशी माहितीही पोलिसांनी दिली. 

राजौरीत शस्त्रसाठा जप्त 
राजौरीतील गमीर मुघला येथे लष्कर व पोलिसांनी संयुक्तरीत्या राबविलेल्या शोधमोहिमेत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. यात काही एके-47 आणि आरपीजी रायफल्स तसेच, दोन पिस्तुले आणि इतर शस्त्रांचा समावेश आहे.

Web Title: marathi news marathi websites Jammu Kashmir Police Indian Army