काश्‍मीरमध्ये आठ महिन्यांत अशांतीमुळे 51 जण ठार 

पीटीआय
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

जम्मू : हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱ्हाण वणी याला 2016 मध्ये सुरक्षा रक्षकांनी ठार केल्यानंतर आठ महिने निर्माण झालेल्या अशांतीमुळे 51 जण ठार झाले, तर नऊ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. त्यातील सहा हजारांहून अधिक जण हे पेलेट गनमुळे जखमी झाले आहेत, अशी माहिती आज जम्मू आणि काश्‍मीर सरकारने दिली. 

नॅशनल कॉन्फरन्सने विधानसभेत विचारलेल्या लेखी प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, काश्‍मीर विभागात आठ जुलै 2016 ते 27 फेब्रुवारी 2017 दरम्यान अशांतीमुळे 51 जण ठार झाले. त्याचप्रमाणे याच काळात पेलेट गन, बंदुकीच्या गोळ्यांमुळे नऊ हजार 42 जण जखमी झाले आहेत. त्यातील सहा हजार 221 जण पेलेट गनमुळे जखमी झाले आहेत.

त्याचप्रमाणे 368 जण बंदुकीच्या गोळ्यांमुळे, पावा शेलमुळे चार जण तर 2 हजार 449 जण अन्य कारणांमुळे जखमी झाले आहेत, असे मुफ्ती यांनी सांगितले. याच काळात 782 जणांना डोळ्यांना इजा झाली असून त्यातील 510 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पेलेट गनने जखमी झालेल्यांची संख्या पाच हजार 197 इतकी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यातील काही जणांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनंतनाग जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे 16 जण मरण पावले असून त्याखालोखाल 13 जण कुलगाम जिल्ह्यात, सात जण पुलवामा आणि पाच जण कुपवाडा जिल्ह्यात मरण पावले आहेत, असे मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.

Web Title: marathi news marathi websites Kashmir Unrest Burhan Wani Indian Army