मूर्ती विसर्जनावर ममता बॅनर्जींनी घातलेली बंदी न्यायालयाने उठविली 

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

कोलकाता : मोहरमच्या कालावधीत दुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यास राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने घातलेली बंदी आज (गुरुवार) कलकत्ता उच्च न्यायालयाने उठविली. रोज मध्यरात्रीपर्यंत मूर्ती विसर्जनाची परवानगीही न्यायालयाने दिली. 

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती कायम राहण्यासाठी पोलिसांनी आवश्‍यक ती सर्व पावले उचलावी आणि दोन्ही समाजांसाठी वेगवेगळे मार्ग आखून द्यावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली. 'नागरिकांच्या हक्कांवर इतक्‍या निर्बुद्धपणे टाच आणता येणार नाही' अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारचे कान उपटले. 'तुम्ही हातातील सत्तेचा कसाही वापर कराल का? तुम्ही सत्ताधारी आहात म्हणजे कोणत्याही आधाराशिवाय असा निर्णय घेऊ शकत नाही' अशी टिप्पणी न्यायालयाने केली. 

मोहरमच्या कालावधीत मूर्ती विसर्जन करण्यास ममता बॅनर्जी सरकारने बंदी घातली होती. याविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकांच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने हा आदेश दिला. 

''नियमन' आणि 'निर्बंध' या दोन्हींमध्ये फरक आहे, हे राज्य सरकारने लक्षात घ्यावे. सर्वांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय कुणाच्याही अधिकारांवर गदा आणता येणार नाही', असेही न्यायालयाने नमूद केले.

Web Title: marathi news marathi websites Mamata Banerjee Kolkata Durga Pooja