तुमचा हात धरून पुढे नेऊ : मोदी 

पीटीआय
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा : चौकटीच्या बाहेर विचार करत युवकांनी नोकऱ्या निर्माण करणारे व्हावे, स्टार्टअप उभारणीसाठी सरकार तुम्हाला पाठबळ देण्यास तयार आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युवकांना केले. 

ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठात झालेल्या 22 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. प्रत्येकाला एकट्यानेच सुरवात करावी लागते, मात्र निवडलेल्या मार्गावरून ध्येयनिष्ठेने वाटचाल केल्यास इतर जण तुम्हाला साथ देतात, असे मोदी यांनी युवकांशी संवाद साधताना सांगितले.

स्टार्टअप सुरू करण्यास प्रोत्साहन देताना मोदींनी, 'काळजी करू नका. पहिले पाऊल उचला, सरकार तुमच्या बरोबर आहे,' असे आश्‍वासन दिले. उद्योग सुरू करताना युवकांनी बॅंक गॅरंटी, कर्ज यांची काळजी करू नये, आम्ही तुम्हाला हाताला धरून पुढे नेऊ, नंतर तुम्ही स्वत:च पुढे जाण्यास समर्थ व्हाल, असे मोदी म्हणाले. या वेळी मोदींनी केंद्र सरकारच्या मुद्रा, कौशल्य विकास, स्टार्टअप फंड अशा विविध योजनांचीही माहिती दिली. 

ग्रेटर नोएडामधील या कार्यक्रमामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट सहभाग घेतला होता. त्यांनी भगवान श्रीरामाचे उदाहरण देताना युवकांना कितीही अडचणी आल्या तरी योग्य मार्ग न सोडण्याचा सल्ला दिला.

Web Title: marathi news marathi websites Narendra Modi