पायाभरणीच्या नावाखाली धूळफेक : मोदींची काँग्रेसवर टीका

यूएनआय
मंगळवार, 16 जानेवारी 2018

बारमेर (राजस्थान) : काँग्रेस पक्षाने केवळ प्रकल्पांची पायाभरणी करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे. या पक्षाने गरिबांसाठी काहीही केले नाही. केवळ पायाभरणी करून विकास होत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष कामही सुरू करावे लागते, अशी कडवट टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.

ते बारमेर येथे 43 हजार 129 कोटी रुपयांच्या तेल शुद्धीकरण प्रकल्प कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. सध्या या तेल शुद्धीकरण प्रकल्पावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पेटली आहे. 

मोदी म्हणाले, ''काँग्रेसने या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी केवळ नव्या लोहमार्गांची घोषणा केली, ही उघड धूळफेक होती. आपल्याला लाभ मिळावा म्हणून काँग्रेसने 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी लष्करातील कर्मचाऱ्यांसाठी 'वन रॅंक, वन पेन्शन'ची घोषणा केली होती. हा तेलशुद्धीकरण प्रकल्प निदान कागदावर अस्तित्वात तरी होता; पण 'वन रॅंक, वन पेन्शन'च्या नशिबी तेही भाग्य नव्हते. काँग्रेसने केवळ 'गरिबी हटाव'चा नारा दिला; पण भाजपने त्या दिशेने काम केले. गरीब महिलांना आम्ही मोफत घरगुती गॅसकनेक्‍शन दिले; तसेच ज्या घरापर्यंत आतापर्यंत वीज पोचली नव्हती त्या चार कोटी घरांपर्यंत आम्ही वीज नेली.'' 

काँग्रेसचा दावा 
तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते 22 सप्टेंबर 2013 रोजी या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी झाली होती, आता पंतप्रधान मोदी पुन्हा तोच सोपस्कार पार पाडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केंद्रीय तेलमंत्री आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेसचे तेव्हाचे कृत्य केवळ राजकीय स्टंट होता, असे त्यांनी म्हटले आहे. 

नेत्यान्याहू यांच्या दौऱ्याचा उल्लेख 
पंतप्रधान मोदी यांनी या भाषणामध्ये इस्राईलचाही जाणीवपूर्वक उल्लेख करत 1918 च्या हैफा लढाईत हुतात्मा झालेल्या दलपतसिंह शेखावत यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी मोदींनी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या भारत दौऱ्याचाही उल्लेख केला. दिल्लीतील तीन मूर्ती हैफा चौकात पहिल्या महायुद्धातील सैनिकांना आदरांजली अर्पण करणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: marathi news marathi websites Narendra Modi Congress