राज्यातील 16 जिल्हे 'स्वच्छ'; नागपूर, पुणे, कोल्हापूर, नगरचा समावेश 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नवी दिल्ली : पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानात देशातील तीन लाख नऊ हजार 161 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. देशातील 303 जिल्हे हागणदारीमुक्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यात नागपूर, कोल्हापूर, नगर व पुण्यासह महाराष्ट्रातील 16 जिल्हे व 34 हजार गावांचा समावेश आहे. राज्यातल्या 30 जिल्ह्यांत 100 टक्के शौचालयांची उभारणी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानात देशातील तीन लाख नऊ हजार 161 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. देशातील 303 जिल्हे हागणदारीमुक्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यात नागपूर, कोल्हापूर, नगर व पुण्यासह महाराष्ट्रातील 16 जिल्हे व 34 हजार गावांचा समावेश आहे. राज्यातल्या 30 जिल्ह्यांत 100 टक्के शौचालयांची उभारणी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. दोन ऑक्‍टोबर 2014 रोजी सुरू झालेल्या स्वच्छ भारत मोहिमेचा लेखाजोखा यात मांडला गेला आहे. देशात गेल्या सव्वातीन वर्षांत पाच कोटींहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षांत 50 लाख आठ हजार 601 शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे, 

या अहवालानुसार सन 2015-16 मध्ये राज्यात 6053 गावे हागणदारीमुक्त जाहीर झाली होती. ही संख्या 2016-17 मध्ये 21 हजार 702 इतकी झाली. टक्केवारीच्या बाबतीत 14.94 वरून सध्या 84.30 टक्के म्हणजेच 34 हजार 157 गावे हागणदारीमुक्त झाली. कोल्हापूर, सातारा, पुणे, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, जालना, बीड, नगर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व रायगड या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. ऑक्‍टोबर 2014 मध्ये ग्रामीण भागात 38.70 टक्के घरगुती शौचालये होती. जानेवारी 2018 मध्ये ही टक्केवारी 76.26 टक्‍क्‍यांवर पोचली आहे. आजअखेर देशात पाच कोटी 94 लाख 45 हजार शौचालयांची निर्मिती झाली. 

ग्रामीण महाराष्ट्रात घरगुती शौचालयनिर्मितीमध्ये उल्लेखनीय कार्य झाले आहे. राज्यातल्या 30 जिल्ह्यांत 100 टक्के शौचालयांची उभारणी झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. नंदुरबार, जळगाव, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा व गडचिरोली या सहा जिल्ह्यांत घरगुती शौचालय उभारणीचे काम 80 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले आहे. 

शौचालय बांधणीला वेग 
महाराष्ट्रात गेल्या सव्वा तीन वर्षांत 50 लाख आठ हजार 601 घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. 2014-15 या वर्षात राज्यात चार लाख 31 हजार 34 शौचालये बांधण्यात आली. 2015-16 या वर्षात आठ लाख 82 हजार 88, सन 2016-17 या वर्षात 19 लाख 17 हजार 191; तर 2017-18 या वर्षात 17 लाख 78 हजार 288 शौचालये बांधण्यात आली आहेत.

Web Title: marathi news marathi websites swachh bharat abhiyan