योगी आदित्यनाथ-आझम खान हातात हात घालून फिरतात तेव्हा..! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

लखनौ : 'राजकारणात कधीच कुणी कायमचा शत्रू नसतो' असं म्हणतात.. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या प्रांगणात काल (गुरुवार) ही उक्ती पुन्हा एकदा सिद्ध झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान हे दोन कट्टर विरोधक काल विधानसभेमध्ये चक्क हातात हात घालून फिरताना दिसले. 

भाजपचे योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे आझम खान हे दोघेही कट्टर विरोधक आहेत. अलीकडच्या काळात दोघांमध्येही अनेकदा शाब्दिक चकमकी झडल्या आहेत. विशेषत:, 'नमाज पठण करतानाही सूर्यनमस्कारातील काही आसनांसारख्या हालचाली होतात' असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले होते. त्यावर कडवट प्रतिक्रिया व्यक्त करताना 'मग योगी आदित्यनाथ नमाज पठण करणार का' असा प्रश्‍न आझम खान यांनी विचारला होता. 

तसेच, 2014 मध्येही या दोघांत जाहीररित्या शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. 'आझम खान यांनी गुजरातच्या मुसलमानांकडून शिकावे आणि मन मोठे करावे' असा सल्ला योगी आदित्यनाथ यांनी दिला होता. 'नरेंद्र मोदी यांच्या धाकामुळे आणि धमकावल्यामुळेच गुजरातमधील मुसलमानांनी भाजपला मतदान केले' असा दावा आझम खान यांनी केला होता. 

या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी योगी आदित्यनाथ आणि आझम खान एकमेकांच्या हातात हात घालून हास्यविनोद करताना दिसल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. 

Web Title: marathi news marathi websites Uttar Pradesh Yogi Adityanath Azam Khan