उत्तर प्रदेशात सर्वाधिक धार्मिक हिंसाचार 

File photo of Yogi Adityanath
File photo of Yogi Adityanath

नवी दिल्ली : देशात 2014 ते 2016 या काळात सर्वाधिक धार्मिक हिंचासार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. धार्मिक हिंसाचाराच्या 450 घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये धार्मिक हिंसाचाराचा घटना जास्त प्रमाणात घडल्या आहेत. 

सरकारच्या वतीने राज्यसभेत आज ही माहिती देण्यात आली. धार्मिक हिंसाचारामध्ये उत्तर प्रदेशपाठोपाठ कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागला आहे.

धार्मिक हिंसाचाराच्या 2014-16 या काळात कर्नाटकमध्ये 279 आणि महाराष्ट्रात 270 घटना घडल्या आहेत. भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यात धार्मिक हिंसाचाराच्या घटना लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये 205; तर राजस्थानमध्ये 200 घटना घडल्या आहेत. धार्मिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये बिहार आणि गुजरात अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. बिहारमध्ये 197 आणि गुजरातमध्ये 182 घटना घडल्या आहेत. 

गोवा, ईशान्य भारत धार्मिक हिंसाचारमुक्त 
गोवा, तसेच ईशान्य भारतातील मेघालय, मिझोराम, नागालॅंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये 2014-16 या काळात कोणताही धार्मिक हिंसाचार झालेला नाही, अशी माहिती सरकारने दिली. यामुळे ही राज्ये धार्मिक हिंसाचारमुक्त ठरली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com