कॉनराड संगमा यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला

पीटीआय
मंगळवार, 13 मार्च 2018

शिलॉंग : मेघालयाच्या नवनिर्वाचित कॉनराड संगमा सरकारने आज मेघालय विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव सहजगत्या जिंकला. विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने 35, तर विरोधात 20 जणांनी मत नोंदवले. ठरावाच्या मतमोजणीत एक मत बाद ठरले, तर अन्य एक जण गैरहजर होते.

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी मतदान केले नाही. विरोधी पक्षनेते मुकुल संगमा यांनी दोन ठिकाणी निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी विजय मिळवला आहे. 

संगमाप्रणित एमडीए सरकारने सहा मार्चला शपथ घेतली होती. या सरकारमध्ये भाजप आणि अन्य प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे. सहा बिगर कॉंग्रेस पक्ष आणि एका अपक्ष आमदारांनी मेघालय डेमोक्रॅटिक आघाडीची निर्मिती केली आहे.

विश्‍वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू करताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते मुकुल संगमा यांनी भाजपसमवेत आघाडी करणाऱ्या कोनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स (एनपीपी)वर टीका केली. सत्तारुढ आघाडीचे नेतृत्व कोणता पक्ष करत आहे? अशी विचारणा त्यांनी भाषणातून केली.

मुकुल संगमा यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री कॉनराड संगमा म्हणाले की, एमडीए सरकारचे नेतृत्व एनपीपी करत आहे आणि यात शंका घेण्याचे कारण नाही. एनपीपीने जवळपास सर्वच प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून बिगर कॉंग्रेसचे सरकार स्थापन केले आहे. त्यात सत्ताधारी मेघालय डेमोक्रॅटिक आघाडीचे 36 आमदार असून त्यात एनपीपीचे 19, यूडीपीचे सहा, पीडीएफचे चार, एचएसपीडीपीचे दोन,भाजपचे दोन, राकांपाचे एक आणि दोन अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

60 आमदारांच्या विधानसभेत 59 जागांवर मतदान झाले. विरोधी पक्ष कॉंग्रेसने 21 जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही बहुमत मिळवता आले नाही. 

Web Title: marathi news meghalaya cm conrad sangma