पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आता 'एअर इंडिया वन'

सागर आव्हाड
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

  • मोदींचं विमान आता क्षेपणास्त्रानं होणार सुसज्ज
  • शत्रूच्या क्षेपणास्त्राचा हवेतच करणार खातमा
  • हवाईदलाचे पायलटच उडवणार विमान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षिततेसाठी आता त्यांच्या दिमतीला अत्याधुनिक विमान येणाराय. हे विमान चक्क क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेनं सज्ज असेल. इतकंच काय त्यांच्या विमानाच्या दिशेनं येणारं क्षेपणास्त्र किंवा एखादा बाँब हवेतल्या हवेत उडवून देण्याची क्षमता या विमानात असणार आहे .

त्यांचं विमान आता एअर इंडियाचे नव्हे तर हवाईदलातलेच पायलट उडवणार आहेत. त्यासाठी हवाईदलाच्या पायलटना या नव्या विमानाच्या उड्डाणाचं प्रशिक्षणही दिलं जातंय. पुढच्या वर्षी जुलै महिन्यात हे नवं विमान भारताच्या ताब्यात येईल.

 

 

अमेरिकी विमान कंपनी बोईंगकडून B777 या प्रकारची ही दोन विमानं भारतात येणार आहेत. त्यांना एअरइंडिया वन म्हणून ओळखलं जाईल. ही विमानं केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासाठीच असतील. या विमानांमध्ये पत्रकार परिषदेसाठी विशेष कक्ष, पेशंट ट्रान्सपोर्ट युनिट आणि मेडिकल इमर्जन्सी कक्षही असेल. या विमानांच्या खरेदीसाठी 4 हजार 469 कोटी 50 लाखांची तरततूद करण्यात आलीय.

'एअरइंडिया वन'मध्ये  काय खास आहे.. 

  • दोन्ही विमानं खास मागणीनुसार बनवली जाणार आहेत. त्यात क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा बसवलेली  असेल. त्यासाठी 1 हजार 349 कोटी रुपये खर्च येणाराय.
  • अमेरिकी अध्यक्षांच्या विमानात अशा प्रकारची यंत्रणा आहे. विमानावर ज्या क्षणी एखाद्या क्षेपणास्त्राचा हल्ला होईल, त्याक्षणी त्यातली यंत्रणा स्वतःहून कार्यरत होईल.
  • या विमानावर लादलेलं क्षेपणास्त्र त्याक्षणी बाहेर पडेल आणि विमानाच्या दिशेनं येणाऱ्या क्षेपणास्त्राचा खातमा करेल.
  • शत्रूच्या विमानाचा खातमा झाला की नाही याची माहिती देखील पायलटला दिली जाईल.

भारत एक महासत्ता बनतोय. मात्र, शत्रूराष्ट्रांपासून सतत कुरापती काढल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर या सुरक्षाप्रणालीनं विमानं सुसज्ज करणं ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे.

WebTitle : marathi news most sophisticated Air India One for PM Modi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news most sophisticated Air India One for PM Modi