भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करू : पंतप्रधान मोदी

पीटीआय
मंगळवार, 13 मार्च 2018

नवी दिल्ली : भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय निश्‍चित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी आज एका अभियानाचे उद्‌घाटन केले. जागतिक पातळीवर 2030 पर्यंत क्षयरोगमुक्तीचे ध्येय ठरले असताना त्याच्या पाच वर्षे आधीच भारतापुरते हे उद्दिष्ट साधण्याचा निश्‍चय सरकारने केला असल्याचे मोदी या वेळी म्हणाले. 

पंतप्रधान मोदी यांनी आज दिल्लीमध्ये क्षयरोग परिषदेचे उद्‌घाटन केले आणि याच कार्यक्रमामध्ये नव्या अभियानाची घोषणा केली. या अभियानाअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्तीसाठी युद्धपातळीवर काम केले जाणार आहे.

'क्षयरोगमुक्तीसाठी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना फारसे यश आलेले नाही. त्यामुळे आता परिस्थितीचा आढावा घेऊन दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे. देशाला या रोगापासून मुक्त करण्यात सर्व राज्यांची मोठी भूमिका असणार आहे. तसे पत्रही मी सर्व मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. तसेच, या विषयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांनीदेखील मोठे योगदान देण्याची गरज आहे,' असे मोदी या वेळी म्हणाले. 

आजची परिषद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयोजित केली असून, यामध्ये जागतिक पातळीवरील नेत्यांनी आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला आहे. सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघातर्फे क्षयरोगमुक्तीसाठी उच्चस्तरीय बैठक होणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर आजची परिषद महत्त्वाची मानली जाते. 

क्षयरोगाचा विळखा 

  • 17 लाख : 2016 मध्ये झालेले मृत्यू 
  • 10 लाख : एका वर्षातील रुग्ण 
Web Title: marathi news Narendra Modi TB Indian Healthcare