बँकांबाबत व्हायरल होत असलेला 'तो' मेसेज खोटा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सध्या सोशल मीडियावर बँकांच्या सेवा शुल्कात वाढ होणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या 20 जानेवारीपासून बँकांकडून सेवा शुल्क लागू होणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, बँकेकडून सेवा शुल्कात कोणत्याही प्रकारे वाढ करण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण 'बँक ऑफ इंडिया'कडून देण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर बँकांच्या सेवा शुल्कात वाढ होणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या 20 जानेवारीपासून बँकांकडून सेवा शुल्क लागू होणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, बँकेकडून सेवा शुल्कात कोणत्याही प्रकारे वाढ करण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण 'बँक ऑफ इंडिया'कडून देण्यात आले आहे. 

नवीन वर्षापासून म्हणजे जानेवारी 2018 पासून सर्व बँकांमधील नवीन सेवा शुल्क लागू होणार आहे. तसेच बँक खातेदाराला रक्कम काढताना आणि ठेवी ठेवताना 18 टक्के जीएसटी लागणार आहे. हे शुल्क ग्राहकांच्या बँक खात्यातून कापून घेतले जाणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात होते. मात्र, आज राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाकडून अशाप्रकारच्या कोणत्याही सेवा शुल्कात वाढ केली जाणार नाही आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून मोफत देण्यात येणाऱ्या सेवांवर कोणत्याही प्रकारचे नवीन अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. 

दरम्यान, आज बँक ऑफ इंडियाकडून हे स्पष्ट करण्यात आले असून, आता लवकरच इतर राष्ट्रीयीकृत बँकांकडून असे स्पष्टीकरण दिले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Marathi news national banks will not be charged additional charges clarifies bank of india