'पद्मावती'च्या फंडिंगप्रकरणाची चौकशी व्हावी; भाजप नेत्याची मागणी

padmavati
padmavati

नवी दिल्ली : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावती' हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शनही लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यानंतरही या चित्रपटाबाबतचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण आता सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि भाजप नेते अर्जुन गुप्ता यांनी 'पद्मावती'ला दुबईतून फंडिंग केल्याचा संशय व्यक्त करत याप्रकरणाची अंमलबजावणी संचलनायलामार्फत चौकशी करावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

'पद्मावती' चित्रपटात राणी पद्मिनी आणि मुघल शासक खिलजी यांच्यातील संबंध दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे राजपूत कर्णी संघटनेसह अनेकांनी या चित्रपटाला विरोध केला होता. तसेच काहींनी हा चित्रपट प्रदर्शित करु दिला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर अखेर चित्रपट निर्मात्यांनी 1 डिसेंबर रोजी होणारे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींनी पद्मावतीला दुबईमधून पैसा पुरवल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर गुप्ता यांनी पंतप्रधान मोदींना याप्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचलनायलयामार्फत केली जावी, अशी विनंती केली.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच त्यांच्यामार्फत याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी कोणतीही शक्यता दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com