मुलगी आणि तिच्या प्रियकराला बंदखोलीत पाहून वडिलांचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जानेवारी 2018

विश्वनाथ हे लघूशंकेसाठी गेले असता त्यांना पूजाच्या खोलीत कोणीतरी असल्याचा संशय आला. जेव्हा ते पूजाच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी धर्मेंद्रला पकडले. यावेळी विश्वनाथने धर्मेंद्रला मारहाण करत त्याला खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले. यादरम्यान दोघांमध्ये हाणामारी झाली. विश्वनाथ यांचा तोल गेल्याने ते तिसऱ्या मजल्यावरून गडगड खाली आले.

नवी दिल्ली : मुलगी आणि तिच्या प्रियकराला बंद खोलीत पाहून एका 45 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला. या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर प्रियकर आणि मुलीच्या वडिलांमध्ये वादावादी झाली. यादरम्यान तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना नोएडातील एट्टा गावात घडली.

विश्वनाथ साहू असे वडिलांचे नाव आहे. पूजाचे घरातील सर्वजण त्यांच्या खोलीत झोपले होते. तेव्हा पूजा आणि धर्मेंद्र हे दोघे एकत्र एका खोलीत होते. विश्वनाथ हे लघूशंकेसाठी गेले असता त्यांना पूजाच्या खोलीत कोणीतरी असल्याचा संशय आला. जेव्हा ते पूजाच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी धर्मेंद्रला पकडले. यावेळी विश्वनाथने धर्मेंद्रला मारहाण करत त्याला खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले. यादरम्यान दोघांमध्ये हाणामारी झाली. विश्वनाथ यांचा तोल गेल्याने ते तिसऱ्या मजल्यावरून गडगड खाली आले.

त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील जिल्हा रुग्णालयातील सेक्टर 30 मधील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

विश्वनाथ यांच्या पत्नी गायत्री यांनी मुलगी पूजा आणि धर्मेंद्र या दोघांविरोधात सेक्टर 20 पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पूजाला बेड्या ठोकल्या. मात्र, धर्मेंद्र फरार झाला आहे. 

''गायत्री यांच्या तक्रारीनुसार आम्ही पूजाला अटक केली आहे. आम्ही धर्मेंद्रचा शोध घेत आहोत. धर्मेंद्रला लवकरच अटक केली जाईल'', असे सेक्टर 20 पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी अनिल कुमार शाई यांनी सांगितले.

Web Title: marathi news national crime delhi news Noida man finds boyfriend in daughters room falls and dies during argument