उत्तर प्रदेशात गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जानेवारी 2018

''आरोपींनी पीडित महिलेचे हात बांधले आणि तिच्या तोंडात कापडाचा बोळा घालून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेला बरेली येथे पुढील वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तिचा जबाब नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे''.

- चंद्रप्रकाश, वरिष्ठ पोलिस अधीक्षक

बदऊन : उत्तर प्रदेशमधील बदऊन येथे एका 32 वर्षीय गरोदर महिलेवर अज्ञात इसमांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.  

पीडित महिला चालण्यासाठी घराबाहेर गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरु केली. त्यानंतर पीडित महिला येथील एका जंगलात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. कुटुंबीयांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले.

''आरोपींनी पीडित महिलेचे हात बांधले आणि तिच्या तोंडात कापडाचा बोळा घालून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेला बरेली येथे पुढील वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तिचा जबाब नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे'', असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक चंद्रप्रकाश यांनी सांगितले.

Web Title: Marathi News National Crime news Out to relieve herself pregnant woman gang raped in UP