प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा ; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जानेवारी 2018

राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस बिकट बनत आहे. तसेच दिल्लीत विषारी वायूचे प्रमाणही काही दिवसांपूर्वी चांगलेच वाढत असल्याचे समोर आले. त्यानंतर आता दिल्ली प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडेबोल सुनावत ''प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा'', असे आदेश दिले आहेत.  

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस बिकट बनत आहे. तसेच दिल्लीत विषारी वायूचे प्रमाणही काही दिवसांपूर्वी चांगलेच वाढत असल्याचे समोर आले. त्यानंतर आता दिल्ली प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडेबोल सुनावत ''प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा'', असे आदेश दिले आहेत.  

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे आदेश दिले. तत्पूर्वी केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले, की वायू प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी व्यापक कारवाई केली जात आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर उपाययोजना करून त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे, असे सांगण्यात आले. 

दरम्यान, वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने राज्यातील वाहनांसाठी सम-विषमची योजना लागू करण्यासाठी हरित लवादाकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर हरित लवादाने दिल्ली सरकारला ही योजना लागू करण्यास सशर्त परवानगी दिली होती.

 

Web Title: Marathi News National Delhi Air Pollution Formulate plan to curb pollution SC tells Centre