पॉर्न पाहण्याचा प्रयत्न केल्यास भजन वाजणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

''पुढील महिन्यात आम्ही या अॅपमध्ये धार्मिक पर्याय देणार आहोत. जर कोणी मुस्लिम व्यक्ती पॉर्नोग्राफिक वेबसाइट पाहण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा त्याला 'अल्ला ओ अल्ला' हे संगीत ऐकायला मिळेल. तसेच आम्ही सर्व धर्मियांसाठी त्यांच्या धर्मानुसार संगीत लोड करणार आहोत"           
- डॉ. व्ही. एन. मिश्रा​

नवी दिल्ली : वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातील डॉक्टर आणि त्यांचा प्रोग्रॅमर मित्र या दोघांनी मिळून पोर्न वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी नवे अॅप तयार केले आहे. या नव्या अॅप मुळे जो कोणी पोर्न वेबसाइट पाहण्याचा प्रयत्न करेल, त्याला ती दिसण्याऐवजी धार्मिक गाणी आणि भजन आपोआप सुरु होतील. 

डॉ. व्ही. एन. मिश्रा आणि अनिकेत श्रीवास्तव दोघांनी या अॅपची निर्मिती केली आहे. या दोघांना आता 'हर हर महादेव' म्हणून संबोधले जात आहे. या अॅपची निर्मिती केल्याने हे दोघेही स्वत:ला समाजसेवक आणि पॉर्नाेग्राफीचे विरोधक म्हणत आहेत. 

''पुढील महिन्यात आम्ही या अॅपमध्ये धार्मिक पर्याय देणार आहोत. जर कोणी मुस्लिम व्यक्ती पॉर्नोग्राफिक वेबसाइट पाहण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा त्याला 'अल्ला ओ अल्ला' हे संगीत ऐकायला मिळेल. तसेच आम्ही सर्व धर्मियांसाठी त्यांच्या धर्मानुसार संगीत लोड करणार आहोत. तसेच या अॅपमध्ये संगीताशिवाय 2000 हून अधिक वेबसाइटस् ब्लॉक करता येऊ शकतात", अशी माहिती डॉ. मिश्रा यांनी वृत्तसंस्थेला दिली.

याबाबत बनारस हिंदू विद्यापीठाचे वैद्यकीय अधीक्षक ओ. पी. उपाध्याय म्हणाले, ''हे एक चांगले पाऊल असून, यामुळे समाजातील 'मानसिकतेचा भ्रष्टाचार' रोखता येऊ शकतो''. 

Web Title: marathi news national doctor creates app to block porn websites play bhajans instead