गोव्यात 3000 हून अधिक टॅक्सीचालक जाणार संपावर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पोलिस, वाहतूक विभागाकडून केली जाणारी पिळवणूक, टॅक्सीचालकांना वेग नियंत्रणासाठी 'स्पीड गव्हर्नन्स' बसवण्यासाठी केली जाणारी सक्ती यांसारख्या विविध मागण्यांसाठी टॅक्सीचालक संपावर जाणार आहेत.

पणजी : गोव्यात 3000 हून अधिक प्रवासी टॅक्सीचालक विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. संपावर जाण्याबाबत टॅक्सीचालकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून इशारा देण्यात आला. त्यानंतर आता टॅक्सीचालक संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.

पोलिस, वाहतूक विभागाकडून केली जाणारी पिळवणूक, टॅक्सीचालकांना वेग नियंत्रणासाठी 'स्पीड गव्हर्नन्स' बसवण्यासाठी केली जाणारी सक्ती यांसारख्या विविध मागण्यांसाठी टॅक्सीचालक संपावर जाणार आहेत. टॅक्सीचालकांकडून पुकारण्यात येणारा हा संप बेकायदा असल्याचे गोव्याचे वाहतूक मंत्री सुदीन धवलीकर यांनी सांगितले.  

''टॅक्सीचालकांकडून पुकारण्यात येणाऱ्या संपासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत. या संप कालावधीत प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी 300 हून अधिक बसेस आणि 1000 हून अधिक खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या संप कालावधीत टॅक्सीचालकांनी कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे'', अशी माहिती धवलीकर यांनी दिली. 

Web Title: Marathi news National Goa News Over 3000 tourist taxi operators go on strike in Goa

टॅग्स