भंडारींची नियुक्ती ही एक अभिमानाची गोष्ट : पंतप्रधान

PM Modi
PM Modi

नवी दिल्ली : भारताच्या दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरोद्गार काढत त्यांचे अभिनंदन केले. तसेच या नियुक्तीवरुन पंतप्रधानांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचेही अभिनंदन केले आहे.

दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात दुसऱ्यांदा नियुक्ती झाली. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरुन शुभेच्छा दिल्या जात आहेत. पंतप्रधान मोदींनीही त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. "न्यायाधीश दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांची ही निवड एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे साध्य झाले आहे", असे ट्विट त्यांनी केले आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद यांच्याबाबतही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान, न्यायाधीश भंडारी यांच्या नियुक्तीवरून काही तासांपूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील 'वंदे मातरम्' म्हणत अभिनंदन केले होते. त्यानंतर आता पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com