निवडणूक आयोगाविरोधात 'आप'ची न्यायालयात धाव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

''हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही''.

अचलकुमार ज्योती, मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने अपात्र ठरविण्याबाबत केलेल्या शिफारसीविरोधात आपच्या आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. या निर्णयाविरोधात आप आमदारांनी याचिका दाखल केली आहे.

बहुमताच्या जोरावर दिल्लीत सरकार आल्यानंतर आपच्या 20 आमदारांनी 2015 साली संसदीय सचिवांची नियुक्ती केली. ही सर्व पदे नफ्याशी निगडित आहेत. याप्रकरणी निवडणूक आयोगाने यातील सर्व 20 आमदारांना अपात्र ठरवले. तसेच निवडणूक आयोगाने याबाबतची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे करण्यात आली.    

त्यानंतर आता आप आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल केली. आपच्या या याचिकेवरील सुनावणी कार्यकारी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांच्या खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे. जरी या अपात्र सदस्य केले तरीदेखील सरकारवर कोणताही प्रकारे परिणाम होणार नाही. 

दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी सांगितले. 
 

 

 

Web Title: Marathi news National News AAP moves Delhi HC against EC recommendation to disqualify 20 MLA