ऑडिशनमध्ये तरुणीला सांगितले कपडे काढायला

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

प्रियकर आहेत का, असतील तर किती ? सेक्सबद्दल काय माहिती आहे का ? यापूर्वी कधी असा अनुभव घेतला का, सेक्स केलास का ? अशाप्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नोत्तराच्या फेरीनंतर अंगावरील संपूर्ण कपडे काढण्यास सांगण्यात आले आणि नग्नावस्थेत समोर असलेल्या पुरुषाचे चुंबन घेण्यासही सांगण्यात आले.

- ऑडिशनसाठी गेलेली तरुणी

बंगळुरु : चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी अनेक नवोदित कलाकारांना प्रचंड मेहनत करावी लागते. तसेच काही वेळा अनपेक्षित मागणीही केली जात असते. याबाबत सध्या कोणीही उघडपणे बोलत नाही. मात्र, एका रिअॅलिटी शोच्या ऑडिशनदरम्यान एका तरुणीला चक्क कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

बंगळुरूतील मल्लेश्वरमधील एका महाविद्यालयात रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन सुरू होते. या ऑडिशनसाठी अनेक तरुणी उपस्थित होत्या. या ऑडिशनदरम्यान तरुणींना खासगी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांना प्रियकर आहेत का, असतील तर किती ? सेक्सबद्दल काय माहिती आहे का ? यापूर्वी कधी असा अनुभव घेतला का, सेक्स केलास का ? अशाप्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नोत्तराच्या फेरीनंतर अंगावरील संपूर्ण कपडे काढण्यास सांगण्यात आले आणि नग्नावस्थेत समोर असलेल्या पुरुषाचे चुंबन घेण्यासही सांगण्यात आल्याचे ऑडिशनसाठी गेलेल्या तरुणीने सांगितले. या अशा गंभीर प्रकारामुळे भयभीत झाल्याचेही त्या तरुणीने सांगितले.

दरम्यान, या अशा धक्कादायक प्रकारामुळे संबंधित तरुणींचे पालक घटनास्थळावर पोचल्यानंतर त्यांनी ऑडिशन बंद पाडले. त्यानंतर याबाबत पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

Web Title: Marathi News National News Audition Girl Ask Remove cloth