भाजप मुख्यमंत्र्यांची दिल्लीत आज बैठक

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नुकतेच उद्‌घाटन झालेल्या भाजपच्या सुसज्ज मुख्यालयात प्रथमच अशा प्रकारची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत भाजपचे इतर वरिष्ठ नेतेही सहभागी होतील.

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत गरीब कल्याण धोरणांतून मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, त्यासाठी उद्या (ता. 28) भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत बोलावली आहे. या बैठकीत गरीब कल्याण योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा होणार असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले. 

नुकतेच उद्‌घाटन झालेल्या भाजपच्या सुसज्ज मुख्यालयात प्रथमच अशा प्रकारची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत भाजपचे इतर वरिष्ठ नेतेही सहभागी होतील. भाजपशासित राज्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास आणि गरीब कल्याणाच्या योजनांची प्रगती, प्रभावी अंमलबजावणी यावर या बैठकीत मंथन केले जाईल, असे भाजपतर्फे सांगण्यात आले.

अर्थसंकल्पात घोषणा झालेल्या शेतीमालाला दीडपट किमान आधारभूत मूल्य, आरोग्य विमा योजनांवर भाजपशासित राज्यांनी भर देणे यावरही चर्चा होणार असल्याचे कळते. 

Web Title: Marathi News National News BJP CM Meeting at Delhi