9 वर्षांच्या बालिकेवर बलात्कार ; 67 वर्षीय शिक्षकास अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

''याप्रकरणी झाकीर अलाम या शिक्षकास अटक करण्यात आली असून, आम्ही यातील आरोपीविरोधात पॉस्को आणि भारतीय दंडविधान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अलाम हा स्थानिक मद्रासा शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला त्या ठिकाणाची चौकशी आम्ही करत आहोत'',.

- राजनीश गुप्ता, पोलिस उपायुक्त (रोहिणी)

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका 9 वर्षीय बालिकेवर 67 वर्षीय नराधामाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना दिल्लीतील नरेला येथे घडली. पीडित बालिकेला वैद्यकीय उपचारांसाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी यातील आरोपीस अटक केली आहे.

Rape

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली. मात्र, याबाबतची तक्रार मंगळवारी देण्यात आली. ''याप्रकरणी झाकीर अलाम या शिक्षकास अटक करण्यात आली असून, आम्ही यातील आरोपीविरोधात पॉस्को आणि भारतीय दंडविधान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अलाम हा स्थानिक मद्रासा शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला त्या ठिकाणाची चौकशी आम्ही करत आहोत'', अशी माहिती पोलिस उपायुक्त (रोहिणी) राजनीश गुप्ता यानी दिली. 

Arrest

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती जय हिंद यांनी ट्विटवरून या घटनेवर संताप व्यक्त केला असून, हा प्रकार खिन्न करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Marathi News National News Crime News Minor Girl Raped By 67 Years Old Teacher