भारताचा विकासदर  घसरता : पी. चिदंबरम 

पीटीआय
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

एनडीएच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत विकासदराची सरासरी काय, असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला. नवीन पद्धतीनुसार तो 7.1 टक्के म्हणजेच यूपीएच्या दहा वर्षांच्या शासनकाळातील सरासरीपेक्षा कमीच असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : "यूपीए'पेक्षा आपल्या कारकिर्दीत देशाचा विकासदर उत्तम असल्याचा 'एनडीए' सरकारने केलेला दावा आज कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी खोडून काढला. यूपीएच्या कारकिर्दीतील सरासरी दहा वर्षांच्या तुलनेत सध्याचा विकासदर खालीच असून, त्यात सातत्याने घसरण होत असल्याचे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे. 

भारताचा विकासदर तीस वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी असल्याचे जागतिक बॅंकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचे म्हणणे आहे. मात्र केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली विकासदर उत्तम असल्याचा दावा करत आहेत. असे चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. एनडीएच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत विकासदराची सरासरी काय, असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला. नवीन पद्धतीनुसार तो 7.1 टक्के म्हणजेच यूपीएच्या दहा वर्षांच्या शासनकाळातील सरासरीपेक्षा कमीच असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. 

गुंतवणूक, बचत, कर्जवाढ ही एनडीएच्या कारकिर्दीतील विकासदराची दिशा असून, या सर्वांत घसरण पहायला मिळत आहे. असेही चिदंबरम यांनी नमूद केले. दरम्यान, अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करतेवेळी एनडीए सत्तेत आल्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रदर्शन चांगले राहिल्याचा दावा केला होता.  

 
 

Web Title: Marathi News National news Development Rate India decreasing says chidambaram