दिल्ली एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के 

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जानेवारी 2018

अफगाणिस्ताची राजधानी काबूल येथील परिसरात हा भूकंप झाला. मात्र, सध्या या भूकंपाने कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याची माहिती देण्यात आलेली नाही. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. हा भूकंप भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जाणवला. या भूकंपाचे धक्के उत्तरीय भारतात जाणवले.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात आज दुपारी भूकंप झाला. या भूकंपानंतर राजधानी दिल्ली आणि जम्मू-काश्मीरात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी असल्याचे समोर आले. हा भूकंप अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात झाला. 

अफगाणिस्ताची राजधानी काबूल येथील परिसरात हा भूकंप झाला. मात्र, सध्या या भूकंपाने कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याची माहिती देण्यात आलेली नाही. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. हा भूकंप भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जाणवला. या भूकंपाचे धक्के उत्तरीय भारतात जाणवले.

यामध्ये दिल्ली एनसीआर, जम्मू आणि काश्मीर आणि राजस्थान, हरियाना या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 12 वाजून 40 मिनिटांनी झाला असून, भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील लोक रस्त्यावर धावत होते. 

Web Title: Marathi News National News earthquake Delhi NCR Afghanistan