तीन राज्यांतील रणसंग्रामाचा निकाल 3 मार्चला

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तिन्ही राज्यांत विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. या तिन्ही राज्यातील मतदानाचे निकाल 3 मार्च रोजी जाहीर केले जाणार आहेत.

नवी दिल्ली : ईशान्येकडील नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगूल आज वाजले. या तिन्ही राज्यांत आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी दिली. 

नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तिन्ही राज्यांत विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. या तिन्ही राज्यातील मतदानाचे निकाल 3 मार्च रोजी जाहीर केले जाणार आहेत. आजपासून या तिन्ही राज्यांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांच्या मतदानासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्सचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती ज्योती यांनी दिली.

Web Title: Marathi news National News Election dates Has been Declared for three states